Sundar Pichai Biography (Marathi) Jaymaharashtra.in

सुंदर पिचाई :
स्वतःला गूगलचा सीईओ(googl CEO) म्हणून इमॅजिन करा, किती छान फिलिंग आहे ना? मित्रांनो तुम्हाला माहित आहे का, जे आज गुगलचे सीईओ आहेत ते एका सामान्य बॅकग्राऊंड मधून आले होते. पण तरीही ते टॉपला गेले. होय! आपण सुंदर पिचाई यांच्याबद्दलच बोलत आहोत, एक इंडियन बिझनेस एक्झिक्युटिव्ह! सुंदर पिचाई हे फार शांत स्वभावाचे होते, त्यांनी लहानपणी केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं, त्यांचे त्याकाळी फार कमी मित्र होते. मित्रांनो, त्यांच्या बायोग्राफी मध्ये आपण सुंदर पिचाई आणि त्यांचा गरिबी पासून श्रीमंतीपर्यंतचा प्रवास जाणून घेणार आहोत. यामध्ये आपण टेक्नॉलॉजीविषयी देखील काही गोष्टी पाहणार आहोत आणि त्यांनी क्रोम (Chrome )आणि अँड्रॉइडला(Android ) टॉप वर कसं नेलं हे देखील आपण पाहणार आहोत. पाहिलाटॉपिक .
सुरुवातीचे जीवन आणि अभ्यास
सुंदर पिचाई यांचे पूर्ण नाव सुंदर राजन पिचाई आहे, त्यांचा जन्म 10 जून 1972 रोजी मदुराई, तामिळनाडू येथे झाला. त्यांनी चेन्नईतील एका शाळेतून त्यांचे शिक्षण पूर्ण केले, ते तेथे अशोक नगर परिसरात राहत होते. पिचाई त्यांच्या वर्गात नेहमीच टॉपर होते. ते लहानपणापासूनच अभ्यासात बेस्ट होते. सुंदर पिचाई यांचे वडील आर. एस पिचाई, इंग्लिश इलेक्ट्रिक कंपनीत इलेक्ट्रिकल इंजिनअर म्हणून काम करत होते. सध्या आर.एस पिचाई आणि त्यांची पत्नी लक्ष्मी पिचाई, सुंदर पिचाई सोबत अमेरिकेत राहतात. लक्ष्मी पिचाई या स्टेनोग्राफर होत्या. लेक्चर आणि स्पीच शॉर्टहँडमध्ये टाइप करणे हे त्यांचे काम होते. सुंदर पिचाई यांच्या वडिलांनी इलेक्ट्रिकल कंपोनेंट्स मनुफॅक्चरींग चे प्लांट सुरु केले होते. आर.एस पिचाई यांच्या प्रोफेशननेच सुंदरला इंजिनिअरिंग शिकण्यासाठी मोटिवेट केलं होतं. सुंदर पिचाई यांच्या आजी रंगनायकी या नेहमी म्हणायच्या की, त्यांचा नातू नेहमी खेळापेक्षा कामाला महत्त्वाचं मानतो.
सुंदर पिचाई यांना क्रिकेटची आवड होती पण त्यांनी कधीच अभ्यासादरम्यान खेळ येऊ दिला नाही. लहानपणी सुंदर पिचाई यांना त्यांची फॅमिली राजेश नावाने हाक मारायची. त्यांना सायन्स आणि मॅथ्स ची फार आवड होती. त्यांचे थोडेच मित्र होते, ते नेहमीच त्यांच्या कामावर जास्त फोकस करायचे. सुंदर पिचाई यांच्या स्कूल प्रिन्सिपल ला तर सुंदर पिचाई कोण होते हे देखील माहीत नव्हतं, पण आज त्यांच्या यशाबद्दल आणि आचिवमेंट बद्दल निश्चितपणे सगळ्यांना माहिती आहे. एका टीचर च्या म्हणण्यानुसार, शंकर नावाचा एक स्टूडेंट पिचाई सोबत अभ्यासात नेहमी स्पर्धा करायचा. तो शंकर आता आय.आय.टी मद्रास मध्ये प्रोफेसर आहे. जवाहर नवोदय विद्यालयातून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर, सुंदर पिचाई हे आय.आय.टी मद्रासच्या कॅम्पसमध्ये असलेल्या एका शाळेत शिकण्यासाठी गेले. त्या शाळेचं नाव होतं, वाणा वाणी स्कूल . तेथील स्टाफला तर सुंदरबद्दल फारसं काही आठवत नाही कारण आता सुंदरला शाळा सोडून 25-30 वर्षे झाली आहेत. सध्या त्यांना शिकवणारे सगळे टीचर्स रिटायर झाले आहेत.
12 वी ची परीक्षा संपल्यानंतर सुंदर पिचाई यांनी JEE ची एक्साम पास केली आणि त्यांनी आय.आय.टी खरगपूरमध्ये एक जागा मिळवली. त्यांनी कॉलेजमध्ये मेटलर्जिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले. ग्रॅज्युएशन ची डिग्री पूर्ण केल्यानंतर सुंदर पिचाई पुढील शिक्षणासाठी परदेशात गेले. मटेरियल सायन्स आणि इंजिनीअरिंग या विषयात मास्टर्स करण्यासाठी ते स्टॅनफोर्डला गेले. तेथे त्यांना सिबेल स्कॉलर ही पदवी देण्यात आली. सुंदर पिचाई यांनी पेनसिल्व्हेनिया युनिव्हर्सिटी च्या व्हार्टन । स्कूलमधून एम.बी.ए चे शिक्षण पुर्ण केले. व्हार्टन येथे, सुंदर पिचाई यांना पामर स्कॉलरशिप साठी नॉमिनेशन देखील मिळाले होते. सुंदर पिचाई यांच्या फॅमिलीतील मेंबर्स असं सांगतात की, सुंदर हे एक फार प्रेमळ व्यक्ती आहेत.
मध्यमवर्गीय जीवन ( middle class life )

पिचाई साध्या बॅकग्राऊंड मधुन आले होते. अमेरिकेत शिकण्यासाठी त्यांना स्कॉलरशिप मिळाली तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांच्या विमानाच्या तिकिटांसाठी त्यांचा वर्षभराचा पगार खर्च केला होता. पिचाई यांची विमानात प्रवास करण्याची ही पहिलीच वेळ होती. तो एक्सपेरिन्स त्यांना चांगलाच आठवतो. मित्रांनो, त्या काळात घरबसल्या फोन कॉल करणे खूप महाग होते. एक मिनिट बोलण्यासाठी त्यांना 2 डॉलरपेक्षा जास्त खर्च करावे लागत होते. ते असेही म्हणाले की, फक्त अमेरिकेत एका बॅग पॅकची किंमत त्यांच्या वडिलांच्या एका महिन्याच्या पगाराएवढी होती. या महागड्या बॅग पॅकऐवजी ते जुने वापरलेले बॅग पॅक विकत घ्यायचे. सुरुवातीला त्यांचे घर मोठे नव्हते, ते त्यांच्या भाडेकरूंसोबत राहतं होते. सुंदर हा त्याच्या लहान भावासोबत त्यांच्या घरातील लिव्हिंग रूममध्ये जमिनीवर झोपायचा. पिचाई । म्हणतात की, त्यांना टेक्नॉलॉजी कशा प्रकारे काम करते हे पाहून आश्चर्य वाटते. त्यांनी आपल्या मुलाला फोन वापरण्याची परवानगी दिली नाही परंतु क्रिप्टोकरन्सीमध्ये इंवेस्टमेंट करून पैसे । कमवण्याची परमिशन मात्र दिली आहे. आपल्या मुलांनाही ते टीव्ही पाहण्याच्या बाबतीत फार डिसिप्लिन मध्ये ठेवतात.
कॉलेजमध्ये पिचाई यांच्याकडे काही विशेष गुण नव्हते. टीव्ही नसलेल्या अगदी छोट्या फ्लॅटमध्ये ते राहत होते, त्याकाळी त्याच्याकडे गाडीही नव्हती. ते आजदेखील आपल्या आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टींना इम्पॉर्टन्स देतात. प्रत्येक मिडल क्लास माणसाप्रमाणे तेही बसमधून प्रवास करायचे. त्यांच्या वडिलांनी नंतर एक निळ्या रंगाची स्कूटर विकत घेतली आणि मग तेच त्यांच्या फॅमिलीसाठी प्रवासाचे एकमेव साधन होते. ती स्कूटर विकत घेण्यासाठी त्यांनी तीन वर्षे बचत केली होती. पिचाई, त्याचे आई-वडील आणि लहान भाऊ त्या छोट्या स्कूटरवर बसायचे. आर्थिक तंगी असूनही पिचाई यांच्या पालकांनी नेहमीच त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी योग्य तो पैसा खर्च केला. त्यांना प्रत्येक संधी मिळावी म्हणून ते सर्व सेविंग त्यांच्या मुलांसाठी खर्च करायचे. त्यांची गर्लफ्रेंड अंजलीला डेट करत असताना ते एका मुलीला गर्ल्स हॉस्टेल मध्ये पाठवायचे आणि मग ती मुलगी हॉस्टेल मध्ये जाऊन जोरात ओरडायची की सुंदर अंजलीला भेटायला आला आहे. त्यांच्यासाठी ते खूप एम्बॅरासिंग होतं. सुंदर अमेरिकेला गेल्यावरही सहा महिने ते अंजलीशी बोलू शकले नाहीत. याचे कारण त्यांची फायनान्शिअल कंडिशन होती. एक काळ असा होता जेव्हा त्यांच्याकडे कॉल करण्यासाठी देखील पैसे नव्हते आणि आज अशी वेळ आली आहे जेव्हा लोकं त्यांच्या अर्निंग बद्दल आणि नेट वर्थबद्दल गुगल वर सर्च करतात. पण! आज ते करोडपती असले तरीदेखील त्यांना साधे जीवन जगायला आवडते.
Sundar Pichai Biography (Marathi)
पर्सनल लाईफ(वयक्तिक जीवन)
सुंदर पिचाई यांनी त्यांची मैत्रीण अंजली सोबत लग्न केले असून त्यांना आता दोन मुलं आहेत. अंजली पिचाई या बिझिनेस अनालिस्ट आणि मॅनेजर आहेत. अंजली आणि सुंदर हे आय.आय.टी खरगपूर मध्ये क्लासमेट होते. सुरुवातीला ते जस्ट फ्रेंड्स होते पण मग कॉलेजच्या लास्ट इअर ला असताना सुंदरने अंजलीला प्रपोज केलं आणि अंजलीने ते अॅक्सेप्ट केलं. कॉलेज संपल्यानंतर पुढील शिक्षणासाठी सुंदरला भारत सोडून अमेरिकेला जावं लागलं. त्यादरम्यान अंजली भारतातच राहिल्याने दोघांमध्ये फारसं बोलणं होतं नव्हतं. त्याकाळी ते सहा महिने एकमेकांशी बोलले नव्हते. याचे कारण म्हणजे सुंदर आणखी फायनान्शिअली सेटल नव्हते आणि ते त्यांच्या गर्लफ्रेंडच्या कॉन्टॅक्ट मध्ये देखील नव्हते. पण नंतर अंजलीही अमेरिकेला गेली. चांगली नोकरी मिळाल्यानंतर सुंदर पिचाई यांनी अंजलीशी लग्न केले. लग्नापूर्वी सुंदरने अंजलीच्या आई-वडिलांची परवानगीही मागितली होती. अंजलीनेच सुंदरला मायक्रोसॉफ्टचा सीईओ न होण्याचा सल्ला दिला होता. हा निर्णय त्यांच्यासाठी खूप योग्य ठरला कारण ते आज सर्वात मोठ्या टेक कंपन्यांपैकी एकाचे चीफ एक्झक्युटिव्ह ऑफिसर (सीईओ) आहेत. सुंदर आणि त्यांच्या पत्नी अमेरिकेतील लॉस अल्टोस हिल्स मध्ये राहतात. त्यांना काव्या नावाची मुलगी आणि किरण नावाचा मुलगा आहे. पिचाई यांना स्पोर्ट्स, विशेषत: फुटबॉल आणि क्रिकेट फार आवडतं. त्यांना फुटबॉलमध्ये एफ.सी बार्सिलोना क्लब फार आवडतो आणि ते त्यांचा प्रत्येक सामना पाहतात. पिचाई हे मास्टर ब्लास्टर क्रिकेटर सचिन तेंडुलकरचेही खूप मोठे फॅन आहेत. पिचाई त्यांच्या शाळेत क्रिकेट टीमचे कॅप्टन असायचे आणि त्यांचा संघ अनेकदा वेगवेगळ्या स्पर्धा जिंकून परतायचा. पिचाई अजूनही त्यांच्या कॉलेज फ्रेंड्स च्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत आणि अनेकदा त्यांच्याशी ते स्काईपवर देखील बोलतात. एक बॉस म्हणून, पिचाईचे एम्प्लॉइ सुंदरला फार सर्पोटिव बॉस मानतात. ते एक महान लीडर आहेत जे आपल्या एम्प्लॉइ सोबत मिळून काम करतात. कॉफी विद करण हा सेलिब्रिटी टॉक शो त्यांचा फेवरेट शो असल्याचे पिचाई यांनी सांगितले होते. पिचाई राजकीय गोष्टींपासून दूर राहतात आणि अशा विषयांवर बोलणं त्यांना आवडत नाही. पण, पिचाई यांनी महिलांविरोधात मेनिफेस्टो लिहणाऱ्या एका एम्प्लॉइ ला काढून टाकलं होतं. जॉर्ज फ्लॉयडच्या हत्येवर त्यांनी एक ट्विटही केले होतं. यावरून सुंदर पिचाई हे जेंडर आणि रॅशनल डिस्क्रिमिनेशन च्या विरोधात असल्याचे समजते.


तंत्रज्ञान(टेक्नोलॉजी) वरील प्रेम
सुंदर लहान असताना त्यांना त्यांच्या आईचा ब्लड टेस्ट रिपोर्ट घेण्यासाठी अनेकदा हॉस्पिटलला जावं लागायचं. त्यांना तिथे पोहचायला बस ने एक तास वीस मिनिटे लागायची आणि मग दवाखान्यात पोहचल्यावर तासनतास रांगेत थांबावं लागायचं. जेव्हा त्यांच्या आई वडीलांनी रोटरी टेलिफोन विकत घेतला तेव्हा त्यांनी वयाच्या 12 व्या वर्षी पहिल्यांदा टेलिफोन पाहिला. तो विकत घेतल्यानंतर सुंदर फोनवरून हॉस्पिटल ला कॉल लावायचे. या जुन्या काळातल्या फोनवरून कॉल करायला किमान 10 मिनिटे लागायची. आणि जेव्हा ते फोन करायचे तेव्हा त्यांना अनेकदा हेच उत्तर मिळायचे की रिपोर्ट अजून तयार झाली नाहीये. पिचाई यांना तो दिवसही आठवतो जेव्हा त्यांच्या फॅमिलीने फ्रीज विकत घेतला होता. तो विकत घेतल्यानंतर, त्याच्या आईला दररोज स्वयंपाक करण्याची गरज पडत नव्हती. कारण ती उरलेलं अन्न फ्रीजमध्ये ठेवू शकत होती आणि कुटुंबासोबत जास्त वेळ घालवू शकत होती. मोठं होत असताना पिचाई यांना अनेक अनुभव आले ज्यामुळे त्यांचे । टेक्नोलॉजी वरचे प्रेम वाढतच गेले. पिचाई यांनी गुगल मध्ये मोठे बदल जाहीर केले आहेत. आता त्यांनी “मोबाइल-फर्स्ट” वरून “आर्टिफिशिल इंटेलिजन्स” वर स्विच होण्याचा निर्णय घेतला आहे. आपला आवाज ऐकून आपली रिक्वेस्ट पूर्ण करणारे व्हॉइस रेकग्निशन प्रोडक्ट्स बनवण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला आहे. तुम्ही या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून गाणे बदलू शकता आणि तुम्ही तुमच्या घराचे लाईट्स देखील बंद करू शकता. दुसरीकडे, गुगल लेन्स वरून कॉम्प्युटर, टेक्स्टला तसचं पाहतो जसं माणूस बघतो. यात तुम्ही तुमचा कॅमेरा एखाद्या रेस्टॉरंटच्या दिशेने नेल्यास गुगल लेन्स तुम्हाला त्या रेस्टॉरंटचे रिव्ह्यू देते. टेक्नॉलॉजीचा अधिकाधिक प्रसार करणं हे पिचाई यांचं टार्गेट आहे.
गुगल ला एक ग्लोबल कंपनी बनवणं हे पिचाई यांचं ध्येय आहे. त्यांचे प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस केवळ काही ठिकाणांपुरतेच मर्यादित राहू नये, असं त्यांना वाटतं. टेक्नोलॉजी किती चांगली आणि सोपी आहे हे संपुर्ण जगाला कळावं अशी त्यांची इच्छा आहे. तसेच त्यांना मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम ‘अँड्रॉइड‘ खूप स्वस्त बनवायची आहे, जेणेकरुन $30 च्या फोन मध्ये पण लोकं त्या ऑपरेटिंग सिस्टम ला यूज करू शकतील. मित्रांनो, पिचाई यांच्या यशाची खरी सुरुवात क्रोमपासून झाली. त्याकाळी, इंटरनेट एक्सप्लोरर हा प्रत्येक कॉम्प्युटरवर वापरला जाणारा सर्वात बेस्ट ब्राउझर होता. पण पिचाई यांनी google फाउंडर लॅरी आणि सर्गी यांना क्रोम ब्राउझर दाखवला आणि लवकरच त्याला मार्केट मध्ये रिलीज केलं आणि क्रोम खूप सक्सेसफुल झालं. पिचाई यांची आणखी एक सक्सेस स्टोरी म्हणजे एंड्रॉइड ची पॉपुलैरिटी. सुंदर पिचाई यांची अँड्रॉईडच्या सीईओ पदी नियुक्ती झाल्यानंतर अँड्रॉईड चे काम देखील खूप फास्ट होत होते.
सुंदर पिचाईसोबत घडलेल्या वाईट घटना, टीका
डिसेंबर 2018 मध्ये, युनायटेड स्टेट्स हाऊस ज्युडिशियर कमिटीने गुगल ला अनेक मुद्द्यांवर प्रश्न विचारले. कमिटीचा असा विश्वास होता की गुगलने पॉलिटिक्ससाठी आपल्या प्लॅटफॉर्मचा गैरवापर केला आणि युजर्सचा कॉन्फिडेंशियल आणि सेन्सिटिव्ह डेटा चोरी केला. गुगलवर चीनकडून देखील खूप आरोप करण्यात आले. सुंदर पिचाई यांनी या सर्व गोष्टी चुकीच्या असल्याचं सांगीतलं. ते म्हणाले की, गुगल आणि त्यांचे एम्प्लॉइज कोणत्याही प्रकारच्या सर्च रिझल्टवर प्रभाव टाकू शकत नाहीत आणि गुगल चे कोणतेही पॉलिटिकल इंटरेस्ट नाहीये, त्यामुळे त्यांच्या युजर्स चा डेटा कोणत्याही पॉलिटिकल अजेंडासाठी वापरला नाही. पिचाई यांनी असेही म्हटले की, युजर्स त्यांच्या डेटाचा रेटिवेशन सहजपणे नाकारू शकतात. चिनी सेन्सर अॅपचे दावेही त्यांनी फेटाळून लावले. पुढे एकदा आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिसर्चर टिमनिट गेब्रू यांना एका अकॅडमिक पेपरमुळे गूगल मधून काढून टाकण्यात आलं. काळ्या किंवा सावळ्या त्वचेच्या चेहऱ्यांपेक्षा गोऱ्या चेहऱ्यांवर फेस डिटरमिनेशन अल्गोरिदम कसे चांगले काम करते, हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी एक पेपर लिहला होता.
टिमनिट एका पेपरच्या को-ऑर्थर देखील होत्या ज्यात टेक्नॉलॉजी मधील इथिकल क्वेस्शन्स समाविष्ट होते. गुगल मधील एका सिनियर ने टिमनिट ला त्यांच्या रिसर्च पेपर मधून त्यांचं नाव काढून टाकायला लावलं. पण त्यांनी त्याला नकार दिला आणि यामुळेच त्यांना गुगल मधून काढून टाकण्यात आलं. ही घटना सोशल मीडियावर खूप पॉप्युलर झाली. एका एम्प्लॉइ ने तर सांगितले की, टिमनिट ला कंपनीतील रांगभेदाविरुद्ध बोलल्याबद्दल काढून टाकण्यात आलं आहे. पण नंतर सुंदर पिचाई यांनी या घटनेवर कमेंट केली आणि सांगितले की, मी याबद्दल दु:खी आहे. एका कृष्णवर्णीय (ब्लॅक) महिलेला तिच्या फील्डमध्ये चांगलं काम करत असताना कंपनी मधून काढून टाकण्यात आलं हे समजल्यावर त्यांनी तिची माफी मागितली आणि या घटनेची पूर्ण जबाबदारीही घेतली. जॉर्ज फ्लॉयडच्या हत्येच्या विरोधात उभं राहिलेल्या पिचाई यांना इंटरनेटवर भारतीयांनी खूप फटकारले. भारतीयांनी सांगितले की, सुंदर अमेरिकेत भेदभावाविरुद्ध बोलले पण भारतीयांसाठी त्यांनी असं कधीच केलं नाही. ट्विटर युजर्सनी विशेषतः दलितांच्या हत्येबद्दल मौन बाळगल्यामुळे पीचाई यांची निंदा केली होती आणि त्यांच्यावर ढोंगीपणाचा देखील आरोप केला होता.
(salary of sundar pichai) सुंदर पिचाईचा पगार
CEO of Google म्हणून त्यांना वार्षिक जवळजवळ २४० मिलियन डॉलर ($) एवढा पगार त्यांना मिळतो जो की भारतीय रुपयात 19,67,58,00,000.00 Indian Rupee एवढा होतो.
निष्कर्ष :
तर मित्रांनो, सुंदर पिचाई यांच्या जीवनातील विविध पैलूंमधून घेऊन जाते. तुम्ही या पुस्तकामध्ये मध्ये त्यांची विनम्र सुरुवात आणि भारतातील त्यांचे जीवन बघितले आहे. तुम्ही त्यांच्या फॅमिलीबद्दल देखील जाणून घेतलं आहे. ही समरी तुम्हाला सुंदर पिचाई अमेरिकेत कसे गेले आणि जगातील सर्वात मोठ्या कंपनीचे सीईओ कसे बनले, हे सांगते. इन शॉर्ट तुम्हाला त्यांचा संघर्ष, पैशांची तंगी आणि टॉपवर पोहोचेपर्यंत त्यांनी घेतलेल्या कष्टाची जाणीव करून देते.