टेनिस विश्वाचा राजा समजला जाणारा रॉजर फेडररने निवृत्तीची घोषणा करत सर्वांनाच आता मोठा धक्का दिला आहे.

फेडररचा हा विक्रम कोणालाच महिती नाही; सलग १७ वर्ष होता अव्वल स्थानावर

४१ वर्षीय फेडररने एक भावनिक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. पुढील आठवड्यात लंडनमध्ये होणाऱ्या लेवर कपमध्ये तो अखेरची व्यवसायिक स्पर्धा खेळणार आहे.

फेडररने २४ वर्षाच्या करिअरमध्ये २० ग्रँड स्लॅम स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. त्याने एकूण १०३ स्पर्धांचे विजेतेपद मिळवले.

फेडररने विंब्लडनची ८, ऑस्ट्रेलियन ओपनची ६, अमेरिकने ओपनची ५ तर क्ले कोर्टवर होणाऱ्या फ्रेंच ओपनचे १ विजेतेपद मिळवले आहे.

फेडरर आता आपला अखेरचा सामना लेव्हर कपमध्ये खेळणार आहे. ही स्पर्धा २३ ते २५ सप्टेंबर या काळात लंडन येथे खेळवण्यात येणार आहे.

टेनिस क्रमवारीत सर्वाधिक काळ नंबर एकवर राहण्याचा विक्रम फेडररच्या नावावर आहे. फेडरर एकूण २३७ आठवडे अव्वल स्थानावर होता.